Home महाराष्ट्र कृषी समृद्धी योजनेबाबतच्या शासन निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

कृषी समृद्धी योजनेबाबतच्या शासन निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

2
Government decision on Krishi Samruddhi Yojana brings relief to farmers affected by heavy rains

मुंबई : जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी, यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्रांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

यामध्ये ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे, जैविक निविष्ठ निर्मिती केंद्र उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळे, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी, शेतीसाठी ड्रोन आदींचा यात समावेश आहे.