Home महाराष्ट्र राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

4
Governor Acharya Devvrat took oath as the 22nd Governor of Maharashtra.

राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल श्री.देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#राज्यपाल#शपथविधी