‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावात युवकांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेत गावातील युवक, नागरिक व अभ्यासिकेचे वापरकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या बैठकीत —
गावातील अभ्यासिकेचे नियमित निरीक्षण (Monitoring) कसे करावे
अभ्यासिकेचा योग्य व प्रभावी वापर कसा वाढवावा
युवक, युवती तसेच सर्व ग्रामस्थांचा सहभाग कसा वाढवता येईल
अभ्यासिकेच्या दैनंदिन कार्यपद्धतीत युवकांची, गावकऱ्यांची भूमिका
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
युवकांच्या पुढाकारामुळे अभ्यासिका ही ग्रामस्तरावर समुदायाच्या सहभागातून चालणारी जबाबदार शैक्षणिक व्यवस्था म्हणून आकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
#collectorofficenandurbar#amachiabhyasikapunhafulale#rurallibraries
















