
तळोदा
मौजे सरदारनगर (ता. तळोदा) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण – कडधान्य अभियान योजनेअंतर्गत सोयाबीन व तूर या मिश्रपिकाच्या प्रात्यक्षिक पेरणीचा उपक्रम राबविण्यात आला. श्री. मान्या गुंजाऱ्या पावरा आणि श्री. गुसायडा बोडा पावरा यांच्या शेतावर पेरणी करून बियाण्यावर थायरम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया शेतकऱ्यांना दाखवण्यात आली.
या प्रात्यक्षिकात उप कृषी अधिकारी श्री. गणेश सोनवणे (सोमावल 2) यांनी स्वतः शेतात उतरून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले.
*यानंतर मंडळ कृषी अधिकारी श्री. विलास निकुम (सोमावल) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पुढील महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली:*
⦁ टोकण यंत्राद्वारे सुलभ व अचूक पेरणी
⦁ प्रधानमंत्री पीक विमा योजना
⦁ ॲग्रीस्टॅक नोंदणीचे फायदे
⦁ महाडिबीटी ठिबक सिंचन योजनेंतर्गत लाभ घेण्याची प्रक्रिया
या उपक्रमात शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. उपस्थित शेतकऱ्यांमध्ये श्री. मान्या पावरा, श्री. विरसिंग पावरा, श्री. आकाश पावरा यांचा समावेश होता. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती स्वाती गावीत (ढेकाटी) यांनीही मार्गदर्शन केले.
*या उपक्रमामुळे शाश्वत शेती, उत्पादनवाढ व पोषणयुक्त आहार यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे.* शेतीस आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले.
#AgriAwareness#NandurbarAgriculture#तळोदा_शेती#PMFBY#AgriStackID#DripIrrigation















