Home नंदुरबार जिल्हा जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

3
Hearing of the District Level Forest Rights Committee concluded under the chairmanship of Hon'ble District Collector Dr. Mittali Sethi

(अक्कलकुवा) आज अक्कलकुवा तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सुनावणीत एकूण ३७८ वनदावे विचारार्थ घेण्यात आले.

बैठकीदरम्यान डॉ. सेठी यांनी संबंधित विभागांना दावे निकाली काढताना पारदर्शकता, पुराव्यांची शहानिशा आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, यावर भर दिला. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ‘वनहक्क कायद्याचा हेतू म्हणजे आदिवासी व पारंपरिक वननिवासींना त्यांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण मिळवून देणे.’

या बैठकीस जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी मा. चंद्रकांत पवार, उपवनसंरक्षक तळोदा मा. सुहास चव्हाण, अशासकीय सदस्य मा. कांतीलाल पाडवी, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, जिल्हा व्यवस्थापक प्रकाश गावित, सहाय्यक रोशन चौरे, विक्रम गायकवाड, माकत्या वसावे, तसेच तालुका व्यवस्थापक दिपक पाडवी उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान सर्व दावेदारांना आपल्या अर्जासंबंधी मते मांडण्याची संधी देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी अधिकारी व समिती सदस्यांना त्वरित, पारदर्शक व न्याय्य निर्णय प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले.

या सुनावणीमुळे अक्कलकुवा तालुक्यातील वनहक्क प्रकरणांचा निपटारा गतीमान होऊन वननिवासींच्या हक्कसंरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.

#Nandurbar#ForestRights#Akkalkuwa#TribalEmpowerment#GoodGovernance#InclusiveDevelopment