Home महाराष्ट्र नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

0
'Hind-Di-Chadar' cultural program in Navi Mumbai on Thursday

मुंबई: संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित ‘हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी, सायं. ६:३० वाजता सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशावर आधारित संगीत, कथन आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

विविध कलाकारांच्या सहभागातून हा कार्यक्रम रंगणार असून प्रेक्षकांना आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार असून समाजातील सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.