Home नंदुरबार जिल्हा मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांचा नवापूर तालुक्याचा दौरा : आपत्ती व्यवस्थापन व विविध...

मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांचा नवापूर तालुक्याचा दौरा : आपत्ती व्यवस्थापन व विविध योजनांचा आढावा

3
Hon'ble District Collector Nandurbar's visit to Navapur Taluka: Review of disaster management and various schemes

मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी नवापूर तालुक्याचा दौरा करत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत मा. पोलीस अधीक्षक नंदुरबार हे देखील उपस्थित होते.

तहसील कार्यालय नवापूर येथे घेण्यात आलेल्या या बैठकीत मॉन्सूनपूर्व तयारी, संभाव्य पूरस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

विशेषतः रंगावली व इतर नद्यांना पूर आल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश दिले गेले.

तालुक्यातील सर्व गावांमध्ये ‘आपदा मित्र’ तयार करून त्यांना आपत्ती काळात कृतीशील राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या गेल्या.

याशिवाय, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा देखील आढावा घेण्यात आला.

यानंतर, मा. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी नवापूर एमआयडीसी येथील प्रकल्पांस भेट देऊन पाहणी केली.

तदनंतर मा. जिल्हाधिकारी यांनी दूधनिर्मिती संदर्भात मौजा पांघराण व चौकी येथील प्रकल्पांची माहिती घेतली.

मौजा कामोद येथे वनपट्टे मोजणीसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यात आली. स्थानिक वनपट्टे धारकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

या संपूर्ण दौऱ्यात महसूल, पोलीस, पंचायत समिती आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

#Nandurbar#CollectorVisit#DisasterPreparedness#JalJeevanMission#MIDC#ForestRights#NandurbarAdministration#नंदुरबार#आपत्तीव्यवस्थापन#वनपट्टा#पाणीपुरवठा#नवापूर#जिल्हाधिकारी_नंदुरबार