Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनसामान्यांनी जो प्रचंड विश्वास दिला त्या विश्वासाच्या बळावर आज मला मुख्यमंत्री...

महाराष्ट्रातील जनसामान्यांनी जो प्रचंड विश्वास दिला त्या विश्वासाच्या बळावर आज मला मुख्यमंत्री होता आले, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आयोजित समारंभात काढले.

3
"I have become the Chief Minister today on the strength of the immense trust placed in me by the people of Maharashtra," said Chief Minister Devendra Fadnavis at a ceremony organized in Nagpur.

भारतरत्न #अटलबिहारीवाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराण्याच्या जोरावर नव्हे तर त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीमुळे ते राजकारणात आले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी प्रत्येक वेळी दिलेली जबाबदारी सार्थकी लावली, या शब्दात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.