(नंदुरबार) राज्यस्तरावरील आयडॉल शिक्षक शोध प्रक्रिया-2025 अंतर्गत जिल्हास्तर समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी मा. अंजली शर्मा (भा.प्र.से.) होत्या.
बैठकीत प्रमुख उपस्थित:
⦁ सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा भा.प्र.से.
⦁ सहाय्यक जिल्हाधिकारी के.के.कनवरीया भा.प्र.से.
⦁ समिती उपप्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत पवार
⦁ डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन,
⦁ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रतिनिधी श्री. रमेश गिरी,
⦁ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय शिंदे आणि श्री. वसंत पाटील,
⦁ सदस्य सचिव डॉ. रमेश चौधरी (वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट)
⦁ चर्चेतील मुख्य मुद्दे:
बैठकीच्या प्रारंभी डॉ. रमेश चौधरी यांनी शासन निर्णय दिनांक 16 एप्रिल 2025 व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. त्यांनी तालुकास्तर समित्यांकडून वेळेत आलेल्या शिक्षक मूल्यांकन आणि शाळा भेटीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला.
तालुकास्तर समित्यांनी निवडलेले 44 शिक्षक जिल्हास्तरीय समितीपुढे मांडण्यात आले. यावरून तालुका निहाय सर्वोत्तम प्रत्येकी चार शिक्षकांची शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली.

निवड प्रक्रियेचा निर्णायक टप्पा:
⦁ प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन यांनी तालुकास्तर कार्यवाहीचे सविस्तर विश्लेषण सादर केले.
⦁ श्री. चंद्रकांत पवार यांनी संपूर्ण प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
⦁ समितीच्या चर्चेनंतर, नंदुरबार जिल्ह्यातील दहा आयडॉल शिक्षकांची निवड खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली:
⦁ नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातून प्रत्येकी 2 शिक्षक
⦁ तळोदा व धडगाव तालुक्यातून प्रत्येकी 1 शिक्षक
या प्रकारे जिल्ह्यातील विविध भागांतील एकूण 10 शिक्षकांना “आयडॉल शिक्षक” म्हणून निवडण्यात आले. समितीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड निश्चित करण्यात आली.
या प्रक्रियेमुळे गुणवत्ताधारित शिक्षकांना राज्यस्तरीय व्यासपीठावर आपले योगदान मांडण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे इतर शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण होणार असून, शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
#nandurbareducation#idolteacher2025#inspirationalteachers#districtlevelcommittee#QualityEducation#MaharashtraEducation#TransformingSchools#डॉमित्तालीसेठी#nandurbardistrict