Home शैक्षणिक “वाचाल तर वाचाल!” — नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त सुरुवात

“वाचाल तर वाचाल!” — नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त सुरुवात

2
“If you read, you will read!” — Nandurbar District Book Festival begins with a spontaneous start

आज कन्यादान मंगल कार्यालय, नंदुरबार येथे दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव सुरु झाला. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने पार पडले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना गोगटे सर म्हणाले, “ग्रंथ माणसाला अनुभवसंपन्न करतात. शिक्षण आपल्याला सुशिक्षित करतं, पण सजग आणि संवेदनशील माणूस घडवतो तो ग्रंथांचाच सहवास.” आजच्या मोबाईल युगात वाचनसंस्कृतीचा प्रसार होणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

“कोणी बाबा कदम वाचा, कोणी इंद्रजीत सावंत… पण वाचत राहा!”

असा दिलेला त्यांचा सल्ला उपस्थितांना प्रेरणा देणारा ठरला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल, प्रा. उमेश शिंदे, प्रविण पाटील (ग्रंथालय महासंघ), धरमसिंग वळवी (जिल्हा ग्रंथालय अधिकारी) व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.

बागुल सरांनी सांगितले, “ग्रंथोत्सव ही गर्दीची नव्हे, दर्दींची गोष्ट आहे!”

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या ग्रंथोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीसुद्धा सुरू आहे. उत्तमोत्तम ग्रंथ सहज उपलब्ध आहेत. नव्या पिढीने या संधीचा लाभ घ्यावा, वाचनाची गोडी जोपासावी, हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

वाचनसंस्कृती जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाका, ग्रंथोत्सवाला जरूर भेट द्या!

#वाचनसंस्कृती

#ग्रंथोत्सव२०२५

#वाचालतरवाचाल

#ग्रंथप्रेमी

#नंदुरबारचेगौरव

#मराठीसाहित्य

#वाचनाचीगोडी

#BookLovers

#ReadingCulture

#LibraryLove

#KnowledgeIsPower