Home नंदुरबार महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार अंतर्गत IFAD प्रतिनिधींची गाव भेट

महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार अंतर्गत IFAD प्रतिनिधींची गाव भेट

1
IFAD representatives visit village under Women's Economic Development Corporation, Nandurbar

(नंदुरबार )महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नंदुरबार अंतर्गत कार्यरत विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD – International Fund for Agricultural Development) चे प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या प्रतिनिधी मंडळामध्ये श्री. केविन (इटली), सौ. गायत्री मॅडम (दिल्ली) व सौ. चित्रा मॅडम (माविम मुख्यालय, मुंबई) यांचा समावेश होता.

या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी प्रतिनिधींनी नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाला भेट दिली. येथे माविमच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या महिलांशी थेट संवाद साधण्यात आला. श्रीमती रमीला वसावे आणि श्रीमती कौशल्या वळवी यांच्या यशोगाथा जाणून घेण्यात आल्या आणि त्याचे चित्रीकरणही करण्यात आले.

धुळवद येथील श्रीमती आशा वळवी यांनी तयार केलेल्या विविध वनऔषधी उत्पादने यांची माहिती घेण्यात आली आणि काही उत्पादने प्रतिनिधींनी प्रत्यक्ष खरेदी केली.

यानंतर ग्रामपंचायत, गाव विकास समिती, माविम मित्र मंडळ व डीएससी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या झाडे लागवड उपक्रमांना भेट देण्यात आली. तसेच पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माविम मित्र मंडळाच्या पुढाकाराने उभारलेल्या सामूहिक शेती प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.

९ ऑक्टोबर २०२५ – हरणखुरी, धडगाव तालुका

दुसऱ्या दिवशी हरणखुरी (ता. धडगाव) येथील भेटीत प्रतिनिधींनी पारंपरिक बीज बँकेचा अभ्यास केला. बीज बँकेच्या कार्यपद्धतीची माहिती श्रीमती वसीबाई मोचडा पावरा यांनी दिली. पारंपरिक बीज साठवणूक आणि संवर्धनाच्या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली.

तसेच येथील एकलव्य महिला बचत गटाने तयार केलेल्या जैविक खतांचे निरीक्षण झाले. शेततळ्यांचे व्यवस्थापन व वृक्षसंवर्धनाबाबत देखील माहिती घेण्यात आली.

प्रतिनिधींसोबत उपस्थित मान्यवर:

या संपूर्ण दौऱ्यात माविमचे नाशिक विभागाचे विभागीय सल्लागार, माविम नंदुरबार जिल्हा कार्यालयाचे अधिकारी, CMRC व्यवस्थापक, लेखापाल व सहयोगिनी (फील्ड वर्कर) उपस्थित होते.

हा दौरा माविमच्या विविध ग्रामीण विकास उपक्रमांची माहिती देणारा आणि स्थानिक महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरला. IFAD प्रतिनिधींनी महिलांच्या स्वयंसहायता गटांच्या कामाची प्रशंसा केली आणि पुढील सहकार्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

Mavim Nandurbar

#माविम#नंदुरबार#IFADदौरा#महिलासक्षमीकरण#स्वयंसहायतागट#MAVIM#IFADVisit#womenempowerment