
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर या दुर्गम आदिवासी गावात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती . अनेक घरांमध्ये पाणी घुसले, अन्नधान्याचे नुकसान झाले आणि गावातील मुख्य रस्ते व लहान पुल वाहून गेल्याने दळणवळण पूर्णतः ठप्प झाले होते .
प्रशासनाची तातडीने कारवाई:
परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदार श्री. विनायक घुमारे व त्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन टीमने तत्काळ गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच पूरग्रस्त कुटुंबांसाठी मदत आणि पंचनाम्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली. पूरग्रस्त कुटुंबांची ओळख पटवून मदतीचे नियोजन तत्परतेने सुरू करण्यात आले. गावातील नागरीकांशी संवाद साधून, आवश्यक वस्तूंचे वितरण आणि स्थलांतरणाचे निर्णय घेण्यात आले.
आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक हेल्पलाईन क्रमांक:
आपत्कालीन मदत सेवा: 112
Nandurbar Police: 100
रुग्णवाहिका सेवा: 102 / 108
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार – 9356507401
हे क्रमांक कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत.
जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालय आणि स्थानिक प्रतिनिधींनी दाखवलेली ही तत्परता ही नंदुरबार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षमतेचे उदाहरण ठरते. भविष्यात अधिक प्रभावी मदत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी योग्य माध्यमांतून वेळेवर माहिती देणे गरजेचे आहे.
#FloodRelief#NandurbarAdministration#AkkalkuwaFlood#EmergencyResponse#CollectorNandurbar #112 #DisasterManagement#HelplineSupport