(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पार पडली. जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
बैठकीतील ठळक मुद्दे व निर्णय
शासकीय वसुलीला गती देणे
प्रलंबित वसुली पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश.
महाराजस्व अभियान:
अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना जबाबदाऱ्या दिल्या.
आर.टी.एस. अपील व अर्धन्यायिक प्रकरणे:
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित आढावा घेण्याच्या सूचना.
पानन व पानंद रस्ते:
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याचे ठरवले.
अनधिकृत जमिनींचे नियमबद्धीकरण:
नियमांनुसार प्रक्रिया करून जमिनीचे कायदेशीरकरण करण्याच्या सूचना.
डिजिटल कामकाजावर भर:
तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावर ई-ऑफिस सुरू करून कामकाज डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय.
नवीन वाळू धोरण:
जिल्ह्यातील वाळू उपशयांना पारदर्शकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यावर चर्चा.
इतर महसूल विषयक अडचणींवर सविस्तर चर्चा
महसूल विभागातील अडथळ्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन.
बैठकीस उपस्थित अधिकारी:
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अंजली शर्मा, के.के.कनवरीया
अपर जिल्हाधिकारी, धनंजय गोगटे
निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे
सर्व तहसीलदार
महसूल विभागाचे इतर अधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा संदेश:
“महसूल विभागाचे काम नागरिकांशी थेट जोडलेले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने सेवा देत शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी.”
#नंदुरबार#महसूलविभाग#डॉमित्तालीसेठी#RevenueDepartment#EOffice#TransparentGovernance#NandurbarDevelopment