भालेर MIDCमध्ये उद्योग वाढ, नवीन गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीस गती देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
उद्योगांना लावलेला दंड कमी/माफ करण्याबाबत चर्चा
काही उद्योगांना सुरूवात उशिरा केल्यामुळे MIDC तर्फे लावण्यात आलेल्या दंडाबाबत उद्योगांकडून सादर झालेल्या मागण्यांवर चर्चा झाली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (MIDC) यांनी यासंदर्भात सांगितले की—
“उद्योगांना दिलासा देता येईल का, दंड माफ किंवा कमी करता येईल का याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.”
यामुळे गुंतवणूकदारांना मोठा लाभ होणार असून नवीन उद्योग स्थापनेस चालना मिळणार आहे.
सुरत (गुजरात) येथे Industrial परिषद आयोजित करण्याची योजना
नंदुरबारमध्ये उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या हेतूने सुरत येथे Industrial परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
या समिटद्वारे मोठ्या उद्योगसमूहांशी संवाद साधून भालेर MIDC मध्ये उपलब्ध संधींची माहिती देण्याची रणनीती तयार केली जात आहे.
वीज पुरवठा सुधारण्यासाठी मोठी प्रगती -5 MVA रोहित्र सुरु करण्यास मंजुरी
मौजे पळाशी सब-स्टेशनमध्ये 5 MVA क्षमतेचे नवीन रोहित्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.
हे रोहित्र पुढील 10 दिवसांत सुरू होणार असून भालेर MIDCमधील दीर्घकालीन वीज समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत.
15 डिसेंबर 2025 पर्यंत भालेर MIDC पूर्णपणे कार्यरत
बैठकीत चर्चा करताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की—
सर्व तांत्रिक, प्रशासकीय व मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या
वीजपुरवठा
औद्योगिक सेवा
पायाभूत सुविधा
या सर्व मुद्द्यांवर जलदगतीने काम सुरू असून 15 डिसेंबर 2025 पर्यंत भालेर MIDC पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ही बैठक गुंतवणूकदारांसाठी विश्वासवर्धक ठरत असून नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा मार्ग अधिक भक्कम होण्यास निश्चित मदत करेल.
#Nandurbar#BhalerMIDC#IndustrialGrowth#InvestmentBoost#MIDC#IndustrialSummit#SuratSummit#PowerInfrastructure#EconomicDevelopment#DrMitaliSethi#IndustryFriendlyDistrict#MakeInNandurbar#EaseOfDoingBusiness#SmartNandurbar#GoodGovernance
















