नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि युथ 4 जॉब फाउंडेशन (Youth4Jobs Foundation) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU) झाला आहे.
ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी सतत कार्यरत असून, त्यांना रोजगार संधी, उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रांमध्ये सक्षम बनवण्याचे कार्य करते.
या करारामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग युवक-युवतींना नव्या संधी प्राप्त होतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल.
या प्रसंगी
जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी,
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावनकुमार,
सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, श्री विजय रिसे
तसेच युथ 4 जॉब फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
#DivyangEmpowerment#NandurbarAdministration#Youth4Jobs#MOU#SkillDevelopment