Home क्रीडा शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण आणि सासवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारलेल्या वातावरणात

शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण आणि सासवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारलेल्या वातावरणात

1
In an atmosphere filled with the presentation of the Shivarajyabhishek and the spontaneous response of the Saswadkars

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडी दाखवून या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सायकलपटूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याने नेहमीच खेळांना प्राधान्य दिले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की, खेळाडूंनाही आनंद आणि प्रेरणा मिळते. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून स्पर्धेचे मार्ग अत्यंत दर्जेदार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सायकलपटूंना विशेष ऊर्जा मिळत असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

#पुणेग्रँडटूर

#बजाजपुणेग्रँडटूर

#BajajPuneGrandTour