
उपवनसंरक्षक श्री. चव्हाण व मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. आडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर तळोदा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शंतनु सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
या उपक्रमात शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मानव-वन्यजीव संघर्षाबाबत माहिती देणे, बिबट्या सहित वन्यप्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, शेतात काम करताना घ्यावयाची काळजी, लहान मुलांच्या सुरक्षेचे मुद्दे अशा महत्त्वाच्या बाबींची सविस्तर जनजागृती करण्यात येत आहे.
पुढील काही दिवसांत वन विभागाची टीम गावा-गावांत जाऊन नागरिक, ऊसतोडणी कामगार आणि शेतमजूरांशी प्रत्यक्ष बांधावर संवाद साधणार आहे. वन्यप्राणी हल्ल्यापासून बचाव, समूहात शेतीकाम करण्याचा सल्ला, तसेच कोणताही हिंस्र प्राणी दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी वनपाल श्रीमती अर्पणा लोहार, वनरक्षक एन. एन. डोगरे, आर. डी. कोकणी, एस. बी. भंडारी, व्ही. जे. पावरा, जे. बी. पाडवी, जी. पी. पावरा, एम. एच. तडवी, ए. जी. पावरा, ए. वी. वसावे तसेच वाहनचालक दीपक बाळदे उपस्थित होते.
वन विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सावधानता वाढून मानव-वन्यजीव संघर्षात लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे.
#वनसुरक्षा#Nandurbar#वनविभाग#HumanWildlifeConflict#TALODA#वन्यजीवसंरक्षण#जनजागृती#SafetyFirst#ForestDepartment#LeopardSafety#MewasiForest















