Home महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा...

राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईल, या उद्देशाने ‘अपना भांडार’ या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात.

3
In the state, multi-purpose consumer warehouses called 'Apna Bhandar' are being run through the Maharashtra Cooperative Consumer Federation to benefit both farmers and consumers.

भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री श्री.रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयात जाऊन आढावा घेतला.

यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, कार्यकारी संचालक विकास रसाळ, महासंघाचे संचालक जयसिंग गिरासे, संचालक गोकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.