समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान, संधी आणि सुलभता मिळावी, हीच खरी समावेशकतेची ओळख आहे. या भावनेला केंद्रस्थानी ठेवून, अपंग हक्क कार्यकर्ती दिक्षा दिंडे यांनी ‘Inclusion यात्रा’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ही 100+ दिवसांची राज्यव्यापी यात्रा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7000+ किमी प्रवास करून समाजात अपंगत्व, विविधता, समानता आणि मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणार आहे.
नंदुरबारमध्ये ‘Inclusion यात्रा’चे आगमन:
या यात्रेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील भेट. जिल्हाधिकारी कार्यालयात मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. धनंजय गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अपंग हक्क कार्यकर्ती दिक्षा दिंडे यांनी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी महात्मा फुले समग्र वाङ्मय देऊन दिक्षा दिंडे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी समावेशकतेविषयी प्रेरणादायी विचार आत्मसात केले.
दिक्षा दिंडे – संघर्षातून समावेशकतेकडे
पुण्यातील कात्रज येथे राहणाऱ्या दिक्षा दिंडे या जन्मतःच दिव्यांग असूनही अपार जिद्द आणि सकारात्मकतेच्या बळावर त्यांनी आयुष्यात मोठं यश मिळवलं आहे.
त्यांनी Bachelor of Business Administration नंतर Governance, Development and Public Policy या विषयात युनायटेड किंगडममधील University of Sussex येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्या Chevening Scholar (2022) म्हणून निवडल्या गेल्या आणि ब्रिटिश सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवली.
दिक्षा दिंडे गेली १०+ वर्षे EquiBridge Foundation या संस्थेद्वारे अपंग व्यक्तींसाठी शिक्षण, प्रवेशयोग्यता आणि समान संधी यासाठी कार्यरत आहेत. त्या TEDx आणि Josh Talks सारख्या मंचांवर आपले अनुभव आणि विचार प्रभावीपणे मांडतात.
संवादातून समावेशन:
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिक्षा दिंडे यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली.
त्यांनी दिव्यांगत्वाविषयी समाजातील गैरसमज दूर करून ‘आपुलकी, सहजीवन, सन्मान, आदर आणि हक्क’ या मूल्यांवर आधारित समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.
Inclusion यात्रेची प्रमुख उद्दिष्टे:
⦁ अपंग हक्कांविषयी सहसंवेदनापूर्ण समज वाढवणे
⦁ शैक्षणिक संस्थांमध्ये समावेशी शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे
⦁ अपंग आणि अपंग नसलेल्या व्यक्तींमध्ये संवादाची दरी कमी करणे
⦁ स्थानिक प्रशासनाची क्षमता वाढवणे आणि निधीचा प्रभावी वापर सुनिश्चित करणे
⦁ कायदेशीर हक्क, सुलभता मानके आणि सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे
⦁ यात्रेतील अनुभवांचे दस्तावेजीकरण करून भविष्यातील धोरणांसाठी पाया रचणे
एकात्मतेचा संदेश
ही यात्रा फक्त प्रवास नाही, तर एक समाजमन परिवर्तनाची चळवळ आहे. दिक्षा दिंडे यांच्या प्रयत्नांमुळे राज्यभरात सशक्त संवाद आणि समावेशक दृष्टिकोनाचा प्रसार होत आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने या उपक्रमाला शुभेच्छा देत, जिल्ह्यात समावेशक शिक्षण, सुलभता आणि संवेदनशीलतेची दिशा अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
#InclusionYatra#EquiBridgeFoundation#DikshaDinde#Nandurbar#SocialAwareness#Accessibility#DisabilityRights#InclusiveEducation#Empathy#Maharashtra