नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) वैयक्तिक सिंचन विहीर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीस सिंचनाच्या दृष्टीने स्थायिक व टिकावू उपाय उपलब्ध करून देणे आहे.
सद्यस्थिती (जून 2025):
* सुरू असलेली कामे – 623 सिंचन विहिरी
* मंजूर कामे – 255 सिंचन विहिरी
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:
1. विहित नमुन्यात अर्ज
2. कृती आराखडा
3. ग्रामसभा ठराव
4. ऑनलाईन डिजिटल ७/१२ व ८अ उतारे
5. जॉबकार्ड व आधार कार्ड
6. बँक पासबुक
7. चर्तु:सीमा दाखला (तलाठी)
8. लाभ न घेतल्याचा कृषी अधिकारी दाखला (इतर योजनांतर्गत)
9. सामूहिक विहिरीसाठी सर्व लाभार्थ्यांचा करार
10. इतर नावांवरील शेतजमिनीसाठी संमतीपत्र
11. हरकत दाखला (शिवार बाहेर शेती असल्यास)
योजनेचा उद्देश:
“हर खेत को पानी” या केंद्र शासनाच्या दृष्टीकोनातून, प्रत्येक गावात किमान 15 विहिरींची उद्दिष्टपूर्ती करून बागायती क्षेत्र वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना लखपती कुटुंब बनविण्याकडे प्रगती करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना जलसिंचनाची शाश्वत सुविधा मिळून, उत्पन्नात वाढ होते. एकदा विहीर बांधली की त्याचा परिणाम वर्षानुवर्षे राहतो, त्यामुळे हा एक दीर्घकालीन आर्थिक विकासाचा आधार ठरतो.
माहिती आणि अर्जासाठी ग्रामपंचायत, कृषी सहायक वा पंचायत समितीच्या मनरेगा विभागाशी संपर्क साधावा.

#MGNREGA#Nandurbar#हरखेतकोपानी#सिंचनविहीर#रोजगारहमी#शेतीविकास#मनरेगा2025#लखपतीशेतकरी#ग्रामीणसमृद्धी