Home नंदुरबार जिल्हा जागतिक युवा दिनानिमित्त एच.आय.व्ही./एड्स जनजागृतीसाठी बाईक रॅली

जागतिक युवा दिनानिमित्त एच.आय.व्ही./एड्स जनजागृतीसाठी बाईक रॅली

3
international youth day nandurbar

जागतिक युवा दिनानिमित्त नंदुरबार शहरात एच.आय.व्ही./एड्स जनजागृतीसाठी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नंदुरबार आणि जिजामाता शिक्षण संस्थेचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

उपनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सूर्यवंशी, नरेंद्र सुलक्षणे, तेजल माळी, जितेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील विविध मार्गातून काढण्यात आलेली ही रॅली जिजामाता फार्मसी महाविद्यालयात सांगता करण्यात आली.

या उपक्रमातून युवकांना सुरक्षित, जबाबदार आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश देण्यात आला. एच.आय.व्ही./एड्सविषयी योग्य माहिती, प्रतिबंधक उपाययोजना आणि समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

#nandurbar#WorldYouthDay#HIV#AIDS#awarenessrally#YouthForChange#collectorofficenandurbar