Home महाराष्ट्र ‘एआय परिषद २०२६’ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक...

‘एआय परिषद २०२६’ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

1
Key points from the speech of Brijesh Singh, Principal Secretary and Director General, Directorate General of Information and Public Relations, at the ‘AI Conference 2026’

जगात काही ठिकाणी एआयच्या सहाय्याने कामे करणाऱ्या पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत आहेत.

▶️ दूरदर्शन, डिजीटल माध्यमांच्या आगमणानंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले.

▶️ तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करावीत.

▶️ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार.

▶️ भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित (ऑटोमेटेड) होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याची जबाबदारी मात्र मानवी बुद्धिवरच असेल. त्यामुळे एआयमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलणार असले, तरी पत्रकारितेची मूलभूत तत्वे विश्वास, सत्यता, विश्वास आणि संपादकीय जबाबदारी कायम राहतील

▶️ एआयमुळे बातम्या रिअल-टाईम, गतिमान आणि वैयक्तिकृत (हायपर पर्सनलाइज्ड) होत आहेत. आजच्या ‘अटेन्शन इकॉनॉमी’मध्ये वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जाते.

▶️ एआयमुळे एक व्यक्ती दिवसाला २०-३० लेख तयार करू शकते. तथापि, माहितीचे प्रमाण वाढले असले, तरी त्यातील विश्वासार्हतेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

▶️ बहुतेक मोठी लँग्वेज मॉडेल्स ही विकिपीडिया, रेडिटसारख्या पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्याने भारतीय अनुभव, संस्कृती आणि भाषांचा डेटा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि ‘डेटा सार्वभौमत्व’ महत्त्वाचे आहे.

▶️ डिजिटल माध्यमांमध्ये ‘एआय स्लॉप’ मुळे तयार होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील हलक्या सामग्रीमुळे भविष्यात पत्रकारिता मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सामान्य बातम्या आणि संशोधनाधारित, तपासात्मक व दर्जेदार पत्रकारितेत विभागू शकते.

▶️ फोटो किंवा व्हिडिओज विशिष्ट डिजिटल स्वाक्षरी (डीएनए सिग्नेचर) समाविष्ट केली जाते. त्यामुळे मूळ सामग्रीमध्ये कोणताही झालेला बदल सहज ओळखता येते. भारतातही अशा प्रोव्हेनेन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे.

▶️ ‘डिप फेक’ सारख्या तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याने खऱ्या व्हिडिओलाही #डिपफेक म्हणण्याची प्रवृत्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट चेक प्रणाली सुरू केली आहे.

#एआय#कृत्रिमबुद्धिमत्ता#पत्रकारिता