
शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीसाठी, पशुपालनासाठी, बागायतीसाठी किंवा मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज भासते तेव्हा सर्वात विश्वासार्ह आणि सोपी योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC). सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना कर्जप्रक्रिया सुलभ, वेगवान आणि स्वस्त बनवते.
KCC का आवश्यक?
कमी व्याजदरात कर्ज
तारणाशिवाय आर्थिक मदत
शेती व allied व्यवसायांना साथ
नैसर्गिक आपत्ती/पिकनुकसान भरपाईसाठी विमा कवच
आर्थिक व्यवहारांवर स्वातंत्र्य व पारदर्शकता
KCC अंतर्गत उपलब्ध कर्ज:
KCC केवळ शेतीपुरते मर्यादित नसून खालील उपजीविकांसाठीही लागू आहे:
• पशुपालन • दुग्धव्यवसाय • कुक्कुटपालन • मत्स्य व्यवसाय • बागायती • शेतमाल साठवण • वाहतूक • घरगुती गरजा (मर्यादित प्रमाणात)
KCC चे प्रमुख वैशिष्ट्ये-
१) कमी व्याजदर:
बँकेचा मूलभूत व्याजदर साधारण ७% असतो, परंतु कर्ज वेळेवर परतफेड केल्यास सरकार २–३% व्याज सवलत देते, त्यामुळे प्रत्यक्ष व्याजदर फक्त ४% च्या आसपास राहतो.
२) तारणमुक्त कर्ज:
सुमारे ₹1.6 लाखांपर्यंत (बँकनिहाय बदल) कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळते.
३) ATM / RuPay कार्ड सुविधा:
KCC सोबत ATM किंवा RuPay कार्ड मिळते. यामुळे गावातील
• BC पॉईंट
• ATM
• POS
या सर्व ठिकाणी सहज पैसे काढता येतात.
४) वापरात लवचिकता (Revolving Credit):
शेतकरी आवश्यकतेनुसार पैसे वापरू शकतो, परत करू शकतो आणि पुन्हा घेऊ शकतो — व्याज फक्त वापरलेल्या रकमेलाच!
५) ३–५ वर्षे वैधता:
⦁ KCC कार्ड ३ ते ५ वर्षांसाठी वैध असते आणि दरवर्षी नूतनीकरण होते.
⦁ KCC चे महत्त्व — शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आर्थिक आधार
⦁ वेळेवर व कमी व्याजात कर्ज उपलब्ध
⦁ सावकारांवरील अवलंबित्व कमी
⦁ शेती तसेच allied व्यवसायांसाठी उपयोगी
⦁ पीकविमा व नुकसान भरपाईची सुरक्षा
⦁ आर्थिक नियोजनात मदत, आकस्मिक प्रसंगी संरक्षण
⦁ KCC साठी आवश्यक कागदपत्रे
(कोणतेही एक स्वीकारले जाते)
१) ओळख पुरावा:
आधार, PAN, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट
२) पत्ता पुरावा:
आधार, मतदान ओळखपत्र, वीज बिल/फोन बिल, निवासी दाखला, राशन कार्ड
३) जमिनीचे कागदपत्रे:
• 7/12 उतारा (अनिवार्य)
• 8A उतारा
• फेरफार नोंद (Mutation Entry)
• भाडेकरार असल्यास Lease Agreement / ग्रामपंचायत प्रमाणपत्र
४) पीक माहिती:
पेरणी तपशील, पीक प्रकार, सर्वे नंबर
५) बँक खाते तपशील:
पासबुक/स्टेटमेंट (६ महिने), IFSC
६) फोटो:
२ पासपोर्ट साईझ फोटो
७) इतर:
आधार–PAN लिंक प्रूफ, अर्ज फॉर्म
KCC अर्ज प्रक्रिया — अगदी सोपी!
जवळच्या राष्ट्रीयकृत/ग्रामीण बँक, DCC, PACS मध्ये भेट द्या
KCC अर्ज फॉर्म भरा
कागदपत्रे जमा करा
बँक अधिकारी पडताळणी करतील
मंजुरीनंतर KCC कार्ड + पासबुक मिळेल
शेतकरी बंधूंनो, आर्थिक सुरक्षेसाठी KCC अत्यावश्यक!
कमी व्याजात, तारणाशिवाय, वेगवान आणि सुरक्षित कर्ज — आपल्या शेतीसाठी मोठे बळ.
[Kisan Credit Card]















