Home नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चा शुभारंभ!

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चा शुभारंभ!

1
Launch of National Child Health Program 2.0!

ंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!

🖥️ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील शासकीय इंग्लिश मिडियम स्कूल, नंदुरबार येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

👧 0 ते 18 वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींसाठी संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम!

✅ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य तपासणी

✅ आजारांचे त्वरित निदान आणि मोफत उपचार

✅ गंभीर आजारांसाठी संदर्भ सेवा व मोफत शस्त्रक्रिया

✅ समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा

📅 १ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी आणि आश्रमशाळांमध्ये आरोग्य तपासणी होणार आहे.

🏥 शासनाने विविध रुग्णालयांशी सामंजस्य करार करून गरजू बालकांना मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

🎤 उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:

🔹 अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

🔹 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे

🔹 उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे

🔹 निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागुल

🔹 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जाफर तडवी

🔹 सहाय्यक प्रकल्प अधिकारी निर्मल माळी

💬 भावनिक क्षण…

👧 रिया जितेंद्र पाटील या बालिकेच्या पालकांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे त्यांच्या मुलीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आणि ती आता पूर्णतः निरोगी असल्याबद्दल शासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. 💖

🙏 कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतलेले अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी:

🩺 डॉ. वर्षा लहाडे, डॉ. गणेश बोराने, डॉ. अमोल मोरे, डॉ. योगेंद्र पाडवी, डॉ. सुशील कुमार मराठे, डॉ. अविनाश चकोर, डॉ. सुजाता दहिवेलकर, डॉ. हिरकणी महाले, डॉ. मोनिका वसावे, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. शुद्धमती ढोके आणि समस्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग.

🔵 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 मुळे हजारो बालकांचे आरोग्य तपासले जाणार आहे आणि गरजू मुलांना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळणार आहे!

📢 पालकांना आवाहन:

✅ आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्या

✅ या आरोग्य मोहिमेचा लाभ घ्या

✅ सुदृढ बालपणासाठी पुढाकार घ्या!

🔖#NationalChildHealthProgram#RBSK2#ChildHealth#PublicHealth#स्वास्थ्य_समृध्दी_संपन्नता#Nandurbar#HealthyFuture