(तळोदा ) तळोदा तालुक्यातील मोड येथील खरवड शिवारात शुक्रवार रोजी शेळ्या चारत असलेल्या व्यक्ती समोर शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात एक शेळीला जागीच ठार करत फरपटत सोयाबीन व उसाच्या शेतात घेऊन गेल्याची घटना घडली. (Nandurbar News)
सविस्तर घटना अशी की, तळोदा तालुक्यातील खरवड शिवारात आष्टे येथील पशुपालक राजु जगन शिंदे यांच्या शेळ्या चरणाऱ्या गुराखी समोर शेळींच्या कळपावर अचानक हल्ला केला आणि एका शेळीला आपल्या जबड्यात पकडली! गुरखा एकदम भयभीत झाला. त्याने पशु मालकाला दूरध्वनी द्वारे संपर्क करुन शेतात बोलवले व शेळीचा शोध घेतला. दरम्यान ग्रामस्त घटनास्थळी पोहोचले असता बिबट्या शेळीला फरफटत उसाच्या शेतात घेऊन गेला होता. शेळीचा शोध घेतल्याने सदरील शेळी पूर्णपणे मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले.
![](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Leopard-Attack-Taloda-1024x576.jpg)
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या उसाची उंची वाढल्यामुळे बिबट्याला उसाच्या शेतात लपण्याची जागा मिळाली असल्याने, तालुक्यातील मोड, खरवड, कढेल, मोहिदा, भवर, प्रतापपूर इत्यादी गावांच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, मजूरवर्ग, अत्यंत भयभीत झाले आहे. अशा घटना दर दोन दिवसांनी ऐकण्यास मिळत असल्याने शेतकरी व शेतमजूर आपला जीव मुठीत धरून शेतातील कामे करीत आहेत. सद्या कापसात निंदणी, कोळपणी हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतमजूर, शेतकरी शेतात दिवस रात्र मेहनत करतांना दिसून येत आहे. परंतु बिबट्याच्या धास्तीने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
बिबट्या हल्ला : वनविभागाला हुलकावणी
वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठीक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. परंतु बिबट्या वनविभागाला हुलकावणी देत असुन पकडुन दाखविण्याचे आव्हान देत आहे. सदरील बिबट्याला वनविभागापेक्षा जास्त अनुभव असल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यात बिबट्या चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.
![leopard attack taloda](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/leopard-attack-taldoa-1024x576.jpg)
बिबट्या हल्ला : उद्या येऊन पंचनामा करु
संध्याकाळी वनविभागातील कर्मचारी यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही मोड व खरवड गावाकडे आलेलो होतो, आता निघुन गेलो आहे. म्हणून तुम्ही मृत शेळीचा फोटो काढून ठेवा आम्ही उद्या येऊन पंचनामा करु असे सांगण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जमदाळे यांना देखील फोन केला परंतु त्यांनी सांगितले की, आधी वनविभागाला कळवा मग मी येईल. अशा प्रकारचे उत्तरे जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मिळत आहे.