
राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत असून येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश आहे. उद्योजक गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात यासाठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्सला पणन मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलीप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.