Home आरोग्य नंदुरबार येथे माता मृत्यू व बाल मृत्यू आढावा सभा

नंदुरबार येथे माता मृत्यू व बाल मृत्यू आढावा सभा

1
Maternal and child mortality review meeting in Nandurbar

नंदुरबार

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील माता मृत्यू व बाल मृत्यू आढावा सभा घेण्यात आली. या सभेत आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील प्रमुख मुद्दे:

⦁ अनिमिया ट्रेकिंग, बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना

⦁ तात्काळ संदर्भ सेवा उपलब्ध करणे व वत्सल्या कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे

⦁ बालकांचे शतप्रतिशत लसीकरण

⦁ गर्भवती महिलांची चार वेळा तपासणी व नियमित सोनोग्राफी सुनिश्चित करणे

⦁ ICDS, आरोग्य विभाग व तृतीयस्तरीय उपचार केंद्र यांच्यात अधिक समन्वय

कारणमीमांसा:

सभेत जिल्ह्यातील १५ बालमृत्यू व ४ माता मृत्यू यांची कारणमीमांसा करण्यात आली. यात उपचारासाठी उशीर, अनिमिया, उच्चजोखीम गरोदरपण, अपुरी तपासणी व कुपोषण ही कारणे आढळली. या संदर्भात तातडीने सुधारणा उपाययोजना आखण्यात आल्या.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन:

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांनी जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण लक्षात घेऊन ICDS व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून नावीन्यपूर्ण योजना राबविण्याची गरज व त्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक सुविधा, औषध साठा व साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

मा. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:

स्थलांतरित माता व बालक यांच्यासाठी स्वतंत्र ‘App आधारित सिस्टीम’ विकसित करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामुळे आरोग्य सेवांचे सातत्याने निरीक्षण होऊन माता व बाल मृत्यूचे प्रमाण घटविण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

उपस्थित मान्यवर:

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, डॉ. अमितकुमार पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजीव वळवी, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजपूत, डॉ. योगेश साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्रातील आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

सभेच्या अखेरीस सर्व विभागांच्या परस्पर सहकार्याने ठोस कार्ययोजना राबवून जिल्ह्यातील माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे ठरविण्यात आले.

#Nandurbar#MaternalHealth#ChildHealth#MCH#SafeMotherhood#ChildCare#PublicHealth#AnemiaFreeIndia#Vaccination#ICDS#HealthForAll