Home नंदुरबार जिल्हा ‘होम-बेस केअरगिव्हर’ पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती;

‘होम-बेस केअरगिव्हर’ पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती;

2
Mega recruitment of 3,500 posts for 'Home-Base Caregiver' posts;

(नंदुरबार) भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या वतीने इस्त्रायलमध्ये ‘होम-बेस केअरगिव्हर’ पदांसाठी तब्बल 3 हजार 500 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पात्रतेचे प्रमुख निकष:

• लिंग: एकूण जागांपैकी 90 टक्के जागा महिलांसाठी आणि 10 टक्के जागा पुरुषांसाठी राखीव आहेत.

• वय: 25 ते 45 वर्षे

• शिक्षण: किमान 10 वी उत्तीर्ण.

• शारीरिक पात्रता: उंची किमान 1.5 मीटर आणि वजन किमान 45 किलो .

• पासपोर्ट: किमान 3 वर्षांची वैधता असलेला पासपोर्ट असणे अनिवार्य आहे.

• भाषा: इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक आहे.

आवश्यक अनुभव आणि प्रमाणपत्र:

• मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 990 तासांचा केअरगिव्हिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा

• किंवा नर्सिंगमधील GDA, ANM, GNM अथवा B.Sc Nursing ची पदविका/पदवी धारक असावेत.

महत्त्वाच्या अटी:

• उमेदवार यापूर्वी कधीही कामासाठी इस्त्रायलला गेलेला नसावा.

• उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, आई-वडील, मुले) सध्या इस्त्रायलमध्ये कार्यरत नसावेत

अर्ज प्रक्रिया:

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी आणि ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी https://nsdcjobx.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 2 लाख पर्यंत मानधन मिळणार असल्याचेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.