मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील मजुरांना सातत्याने काम उपलब्ध होणार असून, रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होणार आहे.
बैठकीतील प्रमुख निर्णय:
ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कामाचे सेल्फ (Self Plan) तयार केले जाणार आहे. यात प्रत्येक महिन्यात मजुरांना कोणती कामे दिली जाणार याचे स्पष्ट नियोजन असेल.
गावागावात शिबिरे आयोजित केली जातील. यामध्ये जॉबकार्ड अपडेट करणे, नवीन जॉबकार्ड जारी करणे व मजुरांची नोंदणी करण्याचे काम होईल.
PTO व APO यांच्या समन्वयाने कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून Spread Sheet तयार केली जाणार आहे. यात मंजूर कामे, नियोजित कामे, सेल्फवरील कामे व उपलब्ध मनुष्यबळ यांचा तपशील असेल.
मंजूर कामांची माहिती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावून पारदर्शकता वाढवली जाईल.
“मागेल त्याला काम” हेल्पलाईन:
लवकरच हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येईल.
नियोजीत कालावधीत कॉल केल्यास 8 दिवसांच्या आत काम दिले जाईल.
संबंधित PTO यांचा मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात येणार असून, सरपंचांशी समन्वय साधून तातडीने कामे उपलब्ध करून दिली जातील.
स्थलांतर रोखण्यासाठी उपाय:
ज्या गावांतील लोक रोजगारासाठी स्थलांतर करतात, त्या गावांतच पुरेशी मनरेगा व इतर योजनेची कामे उपलब्ध करून दिली जातील.
तसेच, स्थलांतरित मजुरांची विशेषतः कुपोषित बालके व गरोदर माता यांची अंगणवाडीत नोंदणी करून त्यांचे ट्रॅकिंग करण्यात येईल. त्यामुळे ते जिथे कामावर असतील, तिथेही त्यांना आरोग्य व शासकीय सुविधा पुरवल्या जातील.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयांमुळे ग्रामीण मजुरांना रोजगाराची हमी मिळणार असून, सामाजिक व आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.
#मनरेगा#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#रोजगारहमी#ग्रामविकास#मागेलत्यालाकाम#MGNREGA#Nandurbar#DistrictAdministration#JobCard#RuralEmployment