Home नंदुरबार सूक्ष्म सिंचन योजना – अनुसूचित जाती व जमातींसाठी विशेष मोहीम!

सूक्ष्म सिंचन योजना – अनुसूचित जाती व जमातींसाठी विशेष मोहीम!

2
Micro Irrigation Scheme – Special Campaign for Scheduled Castes and Scheduled Tribes!

ंदुरबार जिल्हा

जिल्हा कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी “प्रती थेंब अधिक पीक” या तत्त्वावर आधारित सूक्ष्म सिंचन योजनेच्या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

उद्देश:

🔹 सिंचनाखालील क्षेत्रात वाढ

🔹 आर्थिक उत्पन्नात भर

🔹 आधुनिक सिंचन पद्धतींचा लाभ गावपातळीवर

योजनेतील विशेष बाबी:

✅ ठिबक व तुषार संचासाठी 90% पर्यंत अनुदान

➡️ 55% – राष्ट्रीय कृषि विकास योजना

➡️ 25% – मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना

➡️ 10% – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

अर्ज प्रक्रियेची वैशिष्ट्ये:

🔸 गाव पातळीवर सेतू केंद्रातून मोहीम स्वरूपात अर्ज स्वीकार

🔸 महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी

🔸 मार्गदर्शनासाठी क्षेत्रीय कृषि अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांचा सक्रिय सहभाग

आपल्या शेतीसाठी आधुनिक सिंचनाची जोड – आता अधिक उत्पादन, अधिक उत्पन्न!

जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग, नंदुरबार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

#सूक्ष्मसिंचन#NandurbarAgri#SCSTFarmers#DripIrrigation#SprinklerSystem#Mahadbt#RKVY#SmartFarming#AgricultureDevelopment#NandurbarDistrict#कृषिमोहीम2025