Home महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची जपानमधील सागा...

पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर योशिनोरी यामागुची व उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यावरण

0
Minister for Environment, Climate Change and Animal Husbandry Pankaja Munde met with Governor of Saga Prefecture, Japan, Yoshinori Yamaguchi and a high-level delegation to discuss environmental issues.

प्लास्टिक मुक्ती, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचे ठरेल, असा विश्वास मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी गव्हर्नर यामागुची यांनी जपानकडील तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन अनुभव आणि संशोधन क्षमता महाराष्ट्रासोबत सामायिक करण्याची तयारी दर्शवली. आशियाई समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ‘ज्ञान भागीदारी’ च्या माध्यमातून संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली.