
नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य प्रणाली अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामान-अनुकूल बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार आणि ऊर्जा आधारित शाश्वत उपायांवर काम करणारी संस्था SELCO Foundation यांच्यात औपचारिकरित्या सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
या MoU चे उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सौरऊर्जेवर आधारित, हवामानअनुकूल आणि शाश्वत आरोग्य केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्दिष्टाने दोन वर्षांच्या कालावधीसाठी अमलात येणार आहे. ज्यायोगे नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित आरोग्य सेवा मिळू शकतील.
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट:
आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण:
⦁ आरोग्य सुविधांचे ऊर्जा-कार्यक्षम व हवामान-अनुकूल उन्नतीकरण
⦁ सौरऊर्जा प्रणाली (Solar + RMS) बसविणे व मजबूत करणे
⦁ आरोग्य केंद्रांचे पायाभूत सौंदर्यीकरण व कार्यक्षमता वाढविणे
⦁ स्थानिक तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी व ऊर्जा-उद्योजकांचे प्रशिक्षण
⦁ 82 आरोग्य केंद्रांना मॉडेल हेल्थ सेंटर्समध्ये रूपांतरित करण्यासाठी रोडमॅप
जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये शाश्वत ऊर्जा वापराचा प्रसार:
⦁ Decentralized Renewable Energy (DRE) उपायांची अंमलबजावणी
⦁ ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची उपलब्धता
⦁ सौर यंत्रणांची दुरुस्ती, व्यवस्थापन आणि O&M प्रणाली विकसित करणे
आरोग्य कर्मचार्यांची क्षमता बांधणी:
⦁ Saura-E-Mitra प्लॅटफॉर्मवरील प्रशिक्षण
⦁ RMS (Remote Monitoring System) हाताळणी
⦁ O&M SOPs विकसित करणे
⦁ आरोग्य सुविधा कर्मचारी, तांत्रिक पथके व स्थानिक उद्योजकांना प्रशिक्षण
मॉडेल आरोग्य केंद्रांचा जिल्ह्याभरात विस्तार:
पहिल्या टप्प्यात RH मोलगी, PHC शनीमंडळ, SC वाळवळ केंद्रांची उन्नती. यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील 82 आरोग्य केंद्रांमध्ये समान मॉडेलचा विस्तार करण्याचे नियोजन.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांची प्रमुख भूमिका:
⦁ प्रकल्प नियोजन व आर्थिक तरतूद
⦁ परवानग्या, प्रशासकीय सहाय्य आणि समन्वय
⦁ जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांचे बेसलाइन मूल्यांकन
⦁ 82 केंद्रांसाठी पायाभूत सुविधा उन्नतीसाठी निधी पुरवठा
⦁ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत सौर O&M प्रणालींचे प्रभावी नियोजन
अपेक्षित परिणाम:
⦁ जिल्ह्यातील आरोग्य सुविधा 24×7 चालणार
⦁ मातृ व बाल आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा वाढणार
⦁ दूरस्थ व आदिवासी भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारेल
⦁ ऊर्जा खर्चात लक्षणीय बचत होऊन सुविधा अधिक सक्षम बनतील
प्रकल्पाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत डॉ. किरण (सेल्को फाउंडेशन), निकेश इंगळे – संचालक, डोटो हेल्थ, गौरव देशमुख – सार्वजनिक आरोग्य सहयोगी, डोटो हेल्थ, वैष्णवी रामदोहकर – नीती आयोग फेलो आणि मानसी एंडोले – सीएम फेलो उपस्थित होते.
हा MoU नंदुरबार जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे आरोग्य केंद्रांना आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, प्रशिक्षित कर्मचारी आणि उन्नत पायाभूत सुविधा मिळतील. जिल्ह्याची संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, शाश्वत आणि लोककेंद्रित बनण्यास ही भागीदारी महत्त्वाची ठरेल.
#Nandurbar#PublicHealth#SELCOFoundation#ModelHealthCenter#SustainableHealthcare#HealthcareInnovation















