
मुंबई: वेस्टर्न रेल्वे लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या जॅकसन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या २०२५- २०३० या कालावधीसाठी निवडणुका आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी सहकारी निवडणूक प्राधिकरण, सहकार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या आदेश क्रमांक सीईए -१२०११/१९२/२०२५ या आदेशानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या आदेशानुसार वेस्टर्न रेल्वे लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या जॅकसन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या २०२५ – २०३० या कालावधीकरिता निवडणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम सोसायटीच्या www.jacksonsociety.com या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आला आहे तसेच सोसायटीच्या नोंदणीकृत कार्यालयांमध्येही लावण्यात आला आहे. सदस्यांनी याची नोंद घेऊन निवडणुकांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.















