नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली हाय-रिस्क गरोदर माता (HRP) आणि उच्च-धोका बालकांच्या (High-Risk Children) व्यवस्थापन व ट्रॅकिंगसाठी समर्पित *’आरोग्य नियंत्रण कक्ष’* जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आला.
या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री मा. ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, खुशी बेबी संस्थेचे राज्य कार्यक्रम अधिकारी श्री. दिग्विजय शिंदे आणि तांत्रिक टीम उपस्थित होते.
*आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड:*
या नियंत्रण कक्षाचा मुख्य उद्देश म्हणजे उच्च जोखमीच्या गरोदर माता आणि बालकांची वेळेत ओळख करणे, सातत्याने वैद्यकीय देखरेख करणे, आवश्यक उपचार व सल्ला उपलब्ध करून देणे तसेच संस्थात्मक प्रसूती आणि बाल संगोपन सुनिश्चित करणे हा आहे.
*हाय-रिस्क गरोदर माता (HRP) व्यवस्थापन:*
उच्च जोखमीच्या गरोदर मातांची वेळेत ओळख आणि उपचार करण्यासाठी खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे:
⦁ उच्च रक्तदाब, गंभीर रक्ताल्पता, कुपोषण
⦁ आधीचे गुंतागुंतीचे प्रसंग किंवा सिझेरियन इतिहास
⦁ किशोरवयीन मातृत्व किंवा अपुरा वैद्यकीय सल्ला
*उच्च-धोका बालकांचे ट्रॅकिंग:*
जन्मानंतर उच्च जोखमीच्या बालकांची ओळख आणि उपचारावर भर दिला जाईल:
⦁ कमी वजनाचे किंवा प्री-टर्म बाळे
⦁ गंभीर कुपोषणग्रस्त बालके
⦁ अपंगत्वाची शक्यता असलेली बालके
*नियंत्रण केंद्राची कार्यपद्धती:*
खुशी बेबी संस्था, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने या नियंत्रण केंद्राचे संचालन केले जाईल.
वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या समन्वयातून डिजिटल माध्यमाद्वारे ट्रॅकिंग, फॉलो-अप, रेफरल आणि उपचार सेवा पुरवल्या जातील.
*उपलब्ध सेवा:*
नियमित वैद्यकीय सल्ला व टेलिकन्सल्टेशन
रेफरल आणि तातडीची रुग्णसेवा
पोषण सल्ला आणि आरोग्य मार्गदर्शन
संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन
#Nandurbar#MaternalHealth#ChildHealth#SafeMotherhood#खुशीबेबी#HealthInnovation#NandurbarModel#DigitalHealth#MCHCare
















