नंदुरबार,
जिल्ह्यातील स्थलांतराच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मा.जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीत स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. यासाठी मनरेगा अंतर्गत तात्काळ कामे उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
तसेच, स्थलांतर विषयक मार्गदर्शनासाठी जनसाहस या मध्यप्रदेशस्थित स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या संस्थेकडून हेल्पलाईन सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन जिल्ह्यातील प्रशासन व नागरिकांना मिळणार आहे.
याशिवाय, स्थलांतर झालेल्या कुटुंबांनाही शासनाच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आदी योजनांचा लाभ अखंडपणे मिळावा यासाठी एक सशक्त यंत्रणा उभारण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमाचा उद्देश केवळ स्थलांतर रोखणे नसून, सर्वांना सन्माननीय उपजीविका आणि सामाजिक सुरक्षेचे जाळे उपलब्ध करून देणे हा आहे.
सदर बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतराची गरज कमी होईल, तसेच जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल.
#नंदुरबार#स्थलांतर#मनरेगा#डॉमित्तालीसेठी#ग्रामीणविकास#सामाजिकसुरक्षा#जनसाहस