Home नंदुरबार जिल्हा “नंदुरबार जिल्हा कृषि विस्तार कार्यक्रम – आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न”

“नंदुरबार जिल्हा कृषि विस्तार कार्यक्रम – आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न”

3
“Nandurbar District Agricultural Extension Program – Meeting of the Spirit Governing Board concluded”

आत्मा नियामक मंडळाची सभा मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागाने कृषि विस्तार कार्यक्रम राबविण्याचा ठोस निर्धार व्यक्त झाला.

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की –

➡️ शेतकऱ्यांचे संघटन होणे आवश्यक आहे.

➡️ बाजार व्यवस्थेत त्यांना योग्य हक्काची जागा मिळाली पाहिजे.

➡️ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची स्वतंत्र कृषि ओळख तयार होऊ शकते.

🔹 सभेला जिल्हास्तरीय कृषि विभाग अधिकारी, नाबार्ड अधिकारी तसेच १०००० शेतकरी उत्पादक कंपनी योजनेतून स्थापन झालेल्या कंपन्यांचे संचालक व सचिव उपस्थित होते.

🌱 महत्त्वाचे निर्णय:

✅ खरीप हंगामातील पिक नियोजनात शेतकरी गट व कंपन्यांचा समावेश.

✅ शेतीशाळा, प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे, अभ्यासदौरे आयोजित करणे.

✅ राळा, कर, ओवा, अर्धरुको या पिकांचे रब्बी हंगामात नियोजन.

✅ मृदा चाचणीसाठी २७,००० माती नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू.

✅ महिला गटांसाठी सोयाबीन आधारित खाद्य उत्पादने तयार करण्याचे विशेष प्रशिक्षण.

🍚 जिल्ह्यात मायनर मिलेट (भगर, राळा, नाचणी) यांचे मोठे उत्पादन होत असल्याने झोमॅटो व इतर बाजारपेठांशी जोडणीचे नियोजन करण्यात आले. यासाठी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मायनर मिलेट, हैद्राबाद यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

🐄 पशुपालन विभाग आणि माविम यांच्या सहकार्याने दुग्ध संकलन व विपणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जात आहेत.

🎯 या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळून कृषि व्यवसायाचे मूल्यवर्धन होणार आहे.

👏 शेवटी प्रकल्प उपसंचालक श्री. मंगेश पवार यांनी सर्वांचे आभार मानून सभा यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचे घोषित केले.

✅ नंदुरबार कृषी क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे!

#Nandurbar#Agriculture#FarmersFirst#MilletsMission#DrMitaliSethi#ATMA#FarmerProducerCompany#NABARD#AgriBusiness#OrganicFarming#MilletsForFuture#FarmersEmpowerment#DigitalNandurbar