
आत्मा नियामक मंडळाची सभा मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागाने कृषि विस्तार कार्यक्रम राबविण्याचा ठोस निर्धार व्यक्त झाला.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की –
शेतकऱ्यांचे संघटन होणे आवश्यक आहे.
बाजार व्यवस्थेत त्यांना योग्य हक्काची जागा मिळाली पाहिजे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची स्वतंत्र कृषि ओळख तयार होऊ शकते.
सभेला जिल्हास्तरीय कृषि विभाग अधिकारी, नाबार्ड अधिकारी तसेच १०००० शेतकरी उत्पादक कंपनी योजनेतून स्थापन झालेल्या कंपन्यांचे संचालक व सचिव उपस्थित होते.
महत्त्वाचे निर्णय:
खरीप हंगामातील पिक नियोजनात शेतकरी गट व कंपन्यांचा समावेश.
शेतीशाळा, प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे, अभ्यासदौरे आयोजित करणे.
राळा, कर, ओवा, अर्धरुको या पिकांचे रब्बी हंगामात नियोजन.
मृदा चाचणीसाठी २७,००० माती नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू.
महिला गटांसाठी सोयाबीन आधारित खाद्य उत्पादने तयार करण्याचे विशेष प्रशिक्षण.
जिल्ह्यात मायनर मिलेट (भगर, राळा, नाचणी) यांचे मोठे उत्पादन होत असल्याने झोमॅटो व इतर बाजारपेठांशी जोडणीचे नियोजन करण्यात आले. यासाठी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मायनर मिलेट, हैद्राबाद यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
पशुपालन विभाग आणि माविम यांच्या सहकार्याने दुग्ध संकलन व विपणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जात आहेत.
या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळून कृषि व्यवसायाचे मूल्यवर्धन होणार आहे.
शेवटी प्रकल्प उपसंचालक श्री. मंगेश पवार यांनी सर्वांचे आभार मानून सभा यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचे घोषित केले.
नंदुरबार कृषी क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे!

#Nandurbar#Agriculture#FarmersFirst#MilletsMission#DrMitaliSethi#ATMA#FarmerProducerCompany#NABARD#AgriBusiness#OrganicFarming#MilletsForFuture#FarmersEmpowerment#DigitalNandurbar















