Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हाधिकारी यांचा नयामाळ पाड्यावर प्रत्यक्ष दौरा – ग्रामस्थांच्या अडचणी जाणून सकारात्मक...

नंदुरबार जिल्हाधिकारी यांचा नयामाळ पाड्यावर प्रत्यक्ष दौरा – ग्रामस्थांच्या अडचणी जाणून सकारात्मक प्रतिसाद!

15
Nandurbar District Collector's direct visit to Nayamal Pada – Positive response after learning about the problems of the villagers!

स्थळ: नयामाळ, ग्रामपंचायत इच्छागव्हाण, ता. तळोदा

आज मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी दुर्गम व डोंगराळ भागातील नयामाळ पाड्याला प्रत्यक्ष भेट दिली.

नयामाळ हे अत्यंत दुर्गम ठिकाणी टेकडीवर वसलेले असल्यामुळे सामाजिक सुविधा पोहोचवणे कठीण असते.

यावेळी मा. जिल्हाधिकाऱ्यांनी नयामाळ व इच्छागव्हाण येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, आणि सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.

👥 उपस्थित मान्यवर व अधिकारी:

▪️ श्री अनय नावंदर – सहायक जिल्हाधिकारी, तळोदा

▪️ श्री लक्ष्मण पाटील – उपवन संरक्षक, मेवासी वन विभाग

▪️ श्री दीपक धिवरे – तहसीलदार, तळोदा

▪️ श्री राजू किरवे – गट विकास अधिकारी, तळोदा

▪️ तसेच इतर विभागातील क्षेत्रीय कर्मचारी

🌿 या भेटीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला. प्रशासन थेट गावात, समस्या थेट ऐकल्या – हीच जनसंपर्काची खरी ताकद!

#DistrictInAction#NayamalVisit#TalodaUpdates#NandurbarCollector

#DirectGovernance#Gavपातळीवरपरिवर्तन#NandurbarUpdates#VoiceOfNandurbar