नंदुरबार जिल्ह्यातील श्री. योहन अरविंद गावित (ता. नवापूर) आणि श्री. सियाराम सिंग पाडवी (ता. अक्कलकुवा) यांनी मत्स्यपालन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ICAR-CIFE (Central Institute of Fisheries Education), मुंबई तर्फे दिला जाणारा डॉ. हीरालाल चौधरी बेस्ट फिश फार्मर पुरस्कार 2024-25 पटकावला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दि. ६ जून २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे.
उल्लेखनीय कामगिरी:
श्री. योहान गावित – प्रधानमंत्री मत्स्यव्यवसाय योजनेअंतर्गत, मुगधन धरणात पिंजरा मत्स्यपालन सुरू करून अल्पावधीतच यश मिळवले. त्यांनी पंगासिअस जातीच्या मत्स्यबीजांची 18 पिंजऱ्यात साठवणूक करून सुरवात केली. त्यानंतर 3 पिंजऱ्यांचे एका पिंजऱ्यात रूपांतर केले ज्यामुळे माशांना जास्त जागा मिळून उत्पादन वाढले. सध्या ते वर्षातून 2 वेळा पीक घेतात ज्यातून त्यांना 96 टन उत्पादन मिळते.
श्री. सियाराम पाडवी – २००८ पासून सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त भागात २६ मच्छीमार सहकारी संस्था स्थापन, ७३ किमी क्षेत्रातील 1258 मच्छीमारांना एकत्रित करून शासन योजना प्रभावीपणे पोहचवण्याचे काम, दुर्गम भागात सहकार्याची नवी उंची गाठली.
पुरस्काराचे वैशिष्ट्य:
मत्स्य उत्पादन व व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण कार्याचा गौरव.
ग्रामीण रोजगार व शेतीपूरक उद्योगाला चालना देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान.
जिल्हा प्रशासन व मत्स्यव्यवसाय विभागाकडून या दोन्ही लाभार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही मच्छीपालन या क्षेत्रात नवसंधी शोधाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

#NandurbarPride#FishFarmingSuccess#ICAR2025#BestFishFarmerAward#MatsyaPuraskar#TribalEmpowerment#RuralInnovation#Matsyavyavsay#YouthInAgriculture#LivelihoodDevelopment
















