(नंदुरबार) राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धा तसेच खेळाडूंचा सत्कार समारंभ जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त क्रीडा संचालक ईश्वर धामणे यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, महेंद्र काटे, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव खुशाल शर्मा, राष्ट्रीय खेळाडू कुणाल भट, उमेश राजपूत, प्रकाश मिस्त्री, योगेश कुंभार, दीपमाला गावीत, एजाज खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.
🏑 मेजर ध्यानचंद हॉकी चषक निकाल:
मुलांमध्ये:
प्रथम : शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार (सिनियर बॉईज)
द्वितीय : एस. ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार
तृतीय : शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार (ज्यु. बॉईज)
मुलींमध्ये:
प्रथम : शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार
द्वितीय : श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय, वैंदाणे
तृतीय : एस. ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार
🏆 खेळाडू सत्कार समारंभ:
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील 120 प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तर : 77 खेळाडू
राष्ट्रीय स्तर : 38 खेळाडू
आंतरराष्ट्रीय स्तर : 3 खेळाडू
खेलो इंडिया व ऑल इंडिया युनिव्हर्सिटी : 2 खेळाडू
तसेच, शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या 13 शाळांना (2022-23 मध्ये 7 शाळा, 2023-24 मध्ये 6 शाळा)ही गौरविण्यात आले.
दीपप्रज्वलन शिवछत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ व श्रीमती सुशमा शहा (प्राचार्या, श्रॉफ हायस्कूल) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास तहसीलदार प्रदीप पवार, मोहन अहिरराव (उपप्राचार्य, डी. आर. हायस्कूल), क्रीडा संयोजक मीनल वळवी यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार जाधव यांनी, प्रास्ताविक महेश पाटील यांनी व आभार प्रदर्शन संजय बेलोरकर यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिन यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संपूर्ण टीमने मेहनत घेतली.
