Home नंदुरबार चारचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरु

चारचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरु

3
New series of registration numbers for four-wheelers launched

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनांसाठी वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर स्वंयचलित (Automatic) नवीन मालिका सुरु होणार असून ज्या वाहन धारकांना चारचाकी वाहनासाठी आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा आहे अशा वाहनधारकांनी 8 मार्च, 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यात अर्ज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावे, प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या धर्तीवर अर्जदारास त्यांचा पसंतीचा/आकर्षक क्रमांक देण्यात येईल. एका क्रमांकासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलावाद्वारे तो नोंदणी क्रमांक देण्यात येईल, यांची वाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.