Home नंदुरबार जिल्हा नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला...

नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश GPF स्लिपसाठी लवकरच विशेष कॅम्प

0
Newly appointed Secondary Education Officer Bhanudas Rokde felicitated; Junior College Teachers' Association's efforts bear fruit; special camp for GPF slips to be held soon.

शहादा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार भानुदास रोकडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारीभावेश सोनवणे, तसेच वेतन अधीक्षक पथक कार्यालय नंदुरबारचे नितीन पाटील प्रमुख उपस्थित होते. संघटनेच्या शिष्टमंडळाने शैक्षणिक वर्ष 2024-25 व 2025-26 मधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या GPF खात्यावरील ऑनलाइन दिसणाऱ्या रकमेवर नियमानुसार व्याज जमा करून अद्ययावत GPF स्लिप तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले. तसेच प्रत्येक शिक्षकाच्या GPF खात्याचा अद्ययावत हिशोब तयार करून GPF स्लिप उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सोबतच एक स्तर वेतन या विषयावर देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी वेतन अधीक्षक नितीन पाटील यांनी संघटनेच्या मागणीची सकारात्मक दखल घेत GPF संदर्भात लवकरच विशेष कॅम्प आयोजित करण्यात येईल. या कॅम्पमध्ये शिक्षकांच्या ऑफलाइन व ऑनलाइन GPF रकमा टॅली करून पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अद्ययावत GPF स्लिप लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनीही शिक्षक संघटनेच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे, जिल्हा सचिव प्रा. भरत चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. अंकुश रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आसिफ शाह तसेच जिल्हा सदस्य प्रा. विजय डोळे उपस्थित होते.