
(नंदुरबार) भारताचे लोहपुरुष आणि आधुनिक भारताच्या एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने “Run For Unity” — एकता दौड आयोजित करण्यात आली होती.
दौडची सुरुवात नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा चौक येथून करण्यात आली. मार्गामध्ये नगरपालिका चौक, अंधारे चौक, धुळे चौफुली मार्गे पुन्हा नेहरू चौक येथे दौडचा समारोप करण्यात आला. संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण पसरले होते.
या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, एंजल नर्सिंग कॉलेज नंदुरबारचे विद्यार्थी आणि भामरे क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याने गगनभेदी घोषणा देत सहभागींचा उत्साह दांडगा होता.
डॉ. मित्ताली सेठी यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितले —
“सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील 562 संस्थानांचे एकत्रीकरण करून भारताला खरी राष्ट्रीय एकता दिली. त्यांचा हा आदर्श प्रत्येक भारतीयाच्या मनात दृढ राहावा हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना आहे.”
कार्यक्रमादरम्यान विजेते धावपटू आणि सहभागींना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस विभागाने या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून जनतेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त घेतलेल्या या एकता दौडीने नंदुरबारच्या जनतेमध्ये देशप्रेम, शिस्त आणि सामूहिक जबाबदारीची भावना बळकट केली.
“एकतेने आपण मजबूत, आणि एकतेनेच भारत महान!”
#Nandurbar#DrMitaliSethi#RunForUnity#NationalUnityDay#SardarVallabhbhaiPatel#IronManOfIndia#EkBharatShreshthaBharat#UnityRun#DistrictAdministration#PoliceDepartment#PublicParticipation#CleanAndStrongIndia#NationFirst#UnityIsStrength#Maharashtra















