Home नंदुरबार भूमी विभागाचे ‘भू-प्रणाम केंद्र’ चालविण्यासाठी आपले सरकार केंद्र चालकांनी संपर्क साधावा

भूमी विभागाचे ‘भू-प्रणाम केंद्र’ चालविण्यासाठी आपले सरकार केंद्र चालकांनी संपर्क साधावा

3
Our government should contact the center operators to run the 'Bhu-Pranam Kendra' of the Land Department.

(नंदुरबा) भू-प्रणाम केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक एम. पी. मगर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

भूमी विभागात सेतू केंद्राच्या धर्तीवर आता राज्यात ‘भू-प्रणाम केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात उपअधीक्षक भूमि अभिलेख, नंदुरबार आणि उपअधीक्षक भूमि अभिलेख, नवापूर या कार्यालयांमध्ये ही केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून भूमी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑनलाइन कामाच्या सुविधा तसेच विविध अभिलेखांच्या नकला शासनाने ठरवून दिलेल्या दरात नागरिकांना पुरविल्या जाणार असल्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक श्री. मगर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.