Home नंदुरबार जिल्हा 13 जुलै रोजी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’;281 हून अधिक पदांसाठी होणार...

13 जुलै रोजी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’;281 हून अधिक पदांसाठी होणार भरती

3
'Pandit Deendayal Upadhyay Job Fair' on July 13; recruitment for over 281 positions.

(नंदुरबार) जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार येथे ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या आणि उद्योजक सहभागी होऊन त्यांच्याकडील 281 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कंपन्यांचा समावेश आहे:

• आयन मल्टिट्रेड (LLP), समशेरपूर

• उज्वल ऑटो (टाटा), नंदुरबार

• आकाश ऑटोमोटिव (महिंद्रा अँड महिंद्रा), धुळे

• अस्तिमो इंडिया प्रा. लि., जळगाव

• नवभारत फर्टिलायझर, धुळे

जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त श्री.वाघ यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.