Home नंदुरबार जिल्हा राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी

राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी

1
Passengers' Federation demands making 'Rajmata Jijau' buses available at the Nandurbar depot.

नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतर आगारांप्रमाणे नंदुरबार आगारात देखील राजमाता जिजाऊ नवीन बसेस उपलब्ध करण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष सुरेश जैन व तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मार्च 2026 मध्ये ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या 3 हजार नवीन आणि अत्याधुनिक बसेसचा ताफा दाखल केला आहे. या बसेस केशरी व पांढऱ्या रंगाच्या असून, गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास मिळावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. एसटी महामंडळाच्या या नवीन बसेसविषयी महत्त्वाची माहिती आहे. बसची रचना आणि वैशिष्ट्येआसन क्षमता या बसेसमध्ये 3×2 पद्धतीची आसन रचना असून एकूण 55 ते 56 आसने आहेत.
आधुनिक यंत्रणा: सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस (GPS) ट्रॅकिंग आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी ‘पॅनिक बटण’ दिले आहे.प्रवाशांसाठी सोयी: बसमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम (घोषणा प्रणाली) आणि इलेक्ट्रॉनिक गंतव्य स्थान दर्शवणारे मार्ग फलक बसवले आहेत.
धुळे विभागातील नंदुरबार आगारात देखील नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध करण्यात यावे. ज्यामुळे या भागातील प्रवाशांना नवीन सुधारित बसेसचा प्रवास करणे सोयीचे होईल. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार शाखेतर्फे सुरेश जैन, महादू हिरणवाळे,
सुरेखा वळवी,  डॉ. गणेश ढोले, राम ठक्कर, बी. डी. गोसावी, वैभव करवंदकर, नितीन पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.