Home महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

2
Patriotic cultural programs organized in Mumbai, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Amravati, Nagpur divisions on the occasion of Republic Day

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त सहा महसूली विभागात गीत, नृत्य, नाट्य यांच्या सादरीकरणातून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

वंदे मातरम् या देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी, रात्रौ  ८:१५वा. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  ‘वंदे मातरम्’  हा देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कार चा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात गायक राहुल गंगाधर जेठे, गायिका प्रिया सतिश पवार आणि भाग्यश्री अभ्यंकर व समुह, तसेच नृत्याविष्कार: फ्युजन इंस्टिट्यूट ऑफ डांस समुह, यांचा सहभाग असून प्रवेश विनामूल्य  आहे तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि आस्वाद घ्यावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.