(तळोदा) नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून एक-लाख वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे.या मोहीमेस प्रतिसाद देत तळोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांच्या पुढाकाराने तळोदा शिवारात ८०० वृक्ष लागवडची सुरूवात करण्यात आली आहे. (Plantation of 800 trees in Taloda from the concept of Nandurbar SP P R Patil)
नंदूरबार जिल्हा पोलिस दलाची एक-लाख वृक्ष लागवड मोहीम
नंदूरबार जिल्हा पोलिस दलाच्या एक-लाख वृक्ष लागवड मोहीमेस प्रतिसाद देऊन नंदूरबार जिल्हा पोलिस अधिक्षक पी आर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात नंदूरबार जिल्हा पोलिस दलातर्फे पर्यावरण संवर्धनासाठी एक लाख वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या पुढाकाराने मालदा व धजापाणी फॉरेस्ट शिवारात ८०० वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेसोबतच पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांचे पर्यावरण व निसर्ग प्रेमाची ओढ वृक्ष लागवडीमुळे जाणवत आहे.सुजाण व जागरुक देशसेवेची भावना याची प्रचिती त्यामुळे नागरिकांना येत आहे.
![Tree Plantation at Taloda Nandurbar](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Tree-Plantation-by-PI-Rahul-Pawar-1024x576.jpg)
तळोदा पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांच्या पुढाकाराने ८०० वृक्ष लागवड
या मोहीमेस प्रतिसाद देत तळोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार साहेब यांच्या पुढाकाराने ८०० वृक्ष लागवडची सुरूवात करण्यात आली.वृक्षलागवड प्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल,पोलिस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराळे, सरपंच गोपी पावरा, पोलीस पाटील सखाराम ठाकरे,उपसरपंच बेताब पावरा,बोखा ठाकरे,ईश्वर खर्डे,संजू खर्डे,पोलिस नाईक विजय विसावे,निलेश खोंडे,राजू जगताप,अजय पवार,मनिलाल पाडवी, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम पावरा,रघूवीर रामळे,टेट्या पावरा,डोंगरसिंग पावरा,सुभाष खर्डे,दत्तू खर्डे,मनेश खर्डे, रोहिदास पावरा,गोजा पावरा आदि उपस्थीत होते.
![Tree Plantation at Taloda Nandurbar](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Tree-Plantation-at-Taloda-Nandurbar-by-Police-department-1024x576.jpg)