
सौरऊर्जेद्वारे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या भारतासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ ही घरगुती ग्राहकांसाठी एक परिवर्तनकारी योजना ठरत आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांना लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून नागरिकांना मोफत वीज मिळविण्यासोबतच अतिरिक्त वीजनिर्मितीद्वारे उत्पन्न मिळविण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
छतावर सौर पॅनेल बसवा – वीजबिल शून्य करा:
घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल बसवून वीजनिर्मिती करता येईल. घरगुती वापरापेक्षा जास्त वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य होते.
उत्पन्नाची सुवर्णसंधी:
जास्तीत जास्त निर्मित वीज महावितरणला विकता येते, ज्यातून नियमित उत्पन्न मिळविता येईल.
थेट अनुदान (DBT) तुमच्या खात्यात:
⦁ 1 किलोवॅटपर्यंत – ₹30,000
⦁ 2 किलोवॅटपर्यंत – ₹60,000
⦁ 3 किलोवॅट व अधिक – ₹78,000 (कमाल)
⦁ गृहनिर्माण संस्था/संकुल – ₹90 लाख (कमाल)
सौरऊर्जेद्वारे दरमहा वीजनिर्मिती क्षमता:
⦁ 1 किलोवॅट – 120 युनिट
⦁ 2 किलोवॅट – 240 युनिट
⦁ 3 किलोवॅट – 360 युनिट
⦁ ही सौर प्रणाली तब्बल 25 वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकते.
आर्थिक सुविधा:
विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध असून, त्यामुळे सौर प्रकल्प उभारणीचा आर्थिक बोजा कमी होतो.
प्रमुख उद्दिष्ट्ये:
प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करणे
दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरविणे
1 कोटी घरांपर्यंत सौरऊर्जेचा लाभ पोहोचविणे
अर्ज कसा करावा?
या राष्ट्रीय पोर्टलला भेट द्या.
राज्य व वीज वितरण कंपनी निवडून नोंदणी करा.
उपलब्ध विक्रेत्यांमधून योग्य विक्रेता निवडून सौर पॅनेल बसवा.
इतर माहिती:
प्रणालीचा आकार, फायदे आणि विक्रेत्यांचे रेटिंग याची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.
ही योजना पूर्णतः faceless आणि paperless असून, प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
‘प्रथम येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर लाभ देण्यात येतो.
हरित ऊर्जेचा स्वीकार करा, पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावा आणि आपल्या घराचे वीजबिल शून्य करा.
आजच नोंदणी करा आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनाचा लाभ घ्या!
#SuryagharYojana#FreeElectricity#SolarEnergy#GreenIndia#RenewableEnergy#PMSuryaGharYojana#DigitalIndia#nandurbar#SustainableFuture#hargharsolar