Home शेती शासनाच्या “शेतकरी सक्षमीकरण” उपक्रमांना चालना – “आमु आखा एक से शेतकरी प्रोड्युसर...

शासनाच्या “शेतकरी सक्षमीकरण” उपक्रमांना चालना – “आमु आखा एक से शेतकरी प्रोड्युसर कंपनी, चौदवाडे” ची वार्षिक सर्वसाधारण सभा

2
Promoting the government’s “Farmer Empowerment” initiatives – Annual General Meeting of “Aamu Akha Ek Se Shetkari Producer Company, Chaudwade”

(नंदुरबार) शासनाच्या “शेतकरी सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण” या उद्दिष्टाला प्रतिसाद म्हणून “आमु आखा एक से शेतकरी प्रोड्युसर कंपनी, चौदवाडे” ची वार्षिक सर्वसाधारण सभा काकडदा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

सदर कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन ‘नमामि सातपुडा समिती, धडगाव’ व ‘आहार साप्ताहिक कार्यक्रम, अंगणवाणी’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत जलसाक्षरता, पोषण, सेंद्रिय शेती व शाश्वत कृषी पद्धतींविषयी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत काकडदा येथील सरपंच सौ. प्रीतम ताई प्रदीप पाडवी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मॅडम यांचे स्वागत केले.

बैठकीदरम्यान मा. डॉ. मित्ताली सेठी यांनी शासनाच्या कृषी व सहकार विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांनी शासकीय योजनांशी संलग्न राहून स्थानिक उत्पादनांचे ब्रँडिंग, मूल्यवर्धन व विक्री व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.

शासनाच्या “आत्मनिर्भर शेतकरी” या संकल्पनेला चालना देत जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते सभासद शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण, साठवण क्षमता आणि व्यवस्थापनात मदत होणार आहे.

कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ दहातोंडे सर यांनी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले.

नाबार्ड, आत्मा संस्था, DAC आणि नमामि सातपुडा समितीच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना व अनुदानांविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित केले.

या प्रसंगी नाबार्डचे DDM श्री. रविंद्र मोरे, आत्मा संस्थेचे श्री. दिपक पटेल, सूर्यदर्शन FPC चे श्री. संदीप वळवी, अ.मो.प. FPC कजला चे श्री. रामसिंग दादा वळवी, DAC संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी व विभागीय कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कंपनीच्या प्रतिनिधींनी केले.

सदर सभेमुळे शासनाच्या कृषीविकास धोरणांना स्थानिक स्तरावर नवी दिशा मिळाली असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास चालना मिळणार आहे. 🌾

#शासनउपक्रम#जिल्हाधिकारीनंदुरबार#डॉमित्तालीसेठी#AamuAakhaEkSeFPC#धडगाव#काकडदा#कृषीविकास#शेतकरीसक्षमीकरण#NABARD#ATMA#NamamiSatpuda#AaharAnganwadi#DistrictAdministration#GoodGovernance#TeamNandurbar